जालना जिल्हा

कोरोना रुग्णाचे पैसे मिळतात ही केवळ अफवा नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये -जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन

  न्यूज जालना, दि. 10 एक कोरोना रुग्ण शोधला म्हणजे शासनाकडून त्या पालिका, महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेला दीड लाख रुपये मिळतात. त्यामुळे सध्या भरमसाठ रुग्ध शोधले जात असल्याबाबत सोशल मिडियावर संदेश फिरत आहे. मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारे कुठलेही पैसे कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळत नाहीत. हा संदेश केवळ एक अफवा आहे. तसेच जालना जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन होणार नसुन ती सुद्धा एक अफवाच असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, कोरोना रुग्णापोटी ग्रामपंचायत, नगर पालिका अथवा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला किंवा रुग्ण शोधला म्हणुन कुठल्याही अधिकाऱ्यांना पैसे मिळत नसतात. शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत संबंधित सभासद पात्र ठरत असल्यास तो थेट एखाद्या रुग्णालयात जाऊन उपचार घेतो. त्या योजनेचा लाभ घेतलेल्या रुग्णाच्या उपचाराचे पैसे थेट त्या रुग्णालयाला मिळतात. त्याच्याशी कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेचा संबंध येत नाही. महात्मा ज्योतिबा फुले जआरोग्य योजनेचा कोरोनाच्या रुग्ण शोधण्याशी संबंधित विषय नाही. या योजनेविषयी इंटरनेटवरसविस्तर माहिती उपलब्ध आहे. हा संदेश केवळ एक अफवाच आहे. कोणीही यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी केले. जालना जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन होणार असल्याची अफवाही सोशल मिडियावरुन प्रसारित होत आहे. जालना जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन होणार नसुन नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांना बळी न पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक