बदनापूर तालुका

आन्वा गावातील अवैध धंदावर पोलिस प्रशासन कारवाई करणार?

आन्वा /सादिक शेख:- गेल्या काही दिवसांपासून आन्वा गावात अवैध देशी दारू, मटका, पत्ता जुगार खुल्लेआम सुरू असून पारध पोलिस प्रशासक या अवैध धंद्यावाल्यांवर कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सध्या आन्वा गावात अवैध देशी दारू, मटका, पत्ता जुगाराने डोके वर काढले असून याकडे पारध पोलीस ठाणे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप नागरिकांनी केला आहे. पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी पदभार स्वीकारताच अवैध दारू धंदेवाल्याचे मुसके आवळे होते. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांची झोप उडाली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यावाल्यांनी डोके वर काढले आहेत. सध्या आन्वा गावात अवैध देशी दारू खुलेआम विक्री केली जात असून मटका, जुगार देखील चालु असतानाही पोलीस याकडे ‘अर्थ’ पूर्ण दुर्लक्ष करत आहेत. आन्वा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून पोलीस आंधळ्य़ाची भूमिका घेत असल्याने या परिसरात खुलेआम अवैध देशी दारू, मटका, पत्ता जुगार असे गावातील काही पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याने गल्लीबोळात जुगाराचे अड्डे, हॉटेल व ढाब्यावर मिळणारी दारू यामुळे तरुणपिढी व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक