भोकरदन तालुका

भोकरदन एसबीआय बँकेसह पोलीस ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव

भोकरदन /मधुकर शहाणे दि १०

भोकरदन येथील एसबीआय बँकेतील एक कर्मचारी व पोलीस स्टेशनमधील एक कर्मचारी कोरोना बाधित झाले आहे. यामुळे एसबीआय बँकेतील व्यवहार ठप्प झाले असून अनिश्चित काळासाठी बँकेतील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. तर बँकेतील व पोलीस ठाण्यातील बाधित’ कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील ५७ जणांचे स्वैब प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे आरोग्य विभागातून माहिती मिळाली आहे.

यामुळे शहरात एकूण बाधित रुग्णसंख्या सहा असून ग्रामीण भागातील जवळपास ४० जणांवर भोकरदन येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. नवीन बाधित रुग्ण आढळल्याने एसबीआय बँक व पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरणा साठी औषध फवारणी करण्यात आली आहे. शहरातील नूतन कॉलोनी , समता नगर व म्हाडा कॉलनीतील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून या भागात नगर परिषद च्या वतीने औषध फवारणी करण्यात आली आहे.

दरम्यान कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व नप प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडून नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक