भोकरदन तालुका

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्षपदी सागर आहेर

पिंपळगाव रेणुकाई/प्रतिनिधी

साकेगाव येथील चैतन्य आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील सागर सुरेश आहेर या विद्यार्थ्याची आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (एआयएमए) या संस्थेमार्फत जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (एआयएमए) ही संस्था राष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करते आणि या विद्यार्थ्यांचे मत सरकार समोर मांडण्याचे कार्य करते. त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी परीक्षेबाबत असलेल्या समस्या या सर्व सरकारसमोर मांडण्याचे कार्य ही संस्था करत असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक