अंबड तालुका

कोरोनामुळे स्कूल व्हॅन चालक आर्थिक संकटात …

अनिल भालेकर/अंबड दि ११

चीन देशापासून सुरु झालेल्या कोरोना महामारी मुळे सर्व जग चाचपडत आहे. भारत देशालाही याची बरीच मोठी किंमत मोजावी लागत आहे. लॉकडाऊन, संचारबंदी करणे गरजेचे होते तरी यामुळे लहान-मोठे व्यापारी, व्यावसायिक,खाजगी नोकरदार, रोजंदारी वर्ग, यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सध्या अनलॉक लागू असले तरी, शाळा,महाविद्यालय, धार्मिक स्थळे यांना सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने दिली नाही.


गेल्या 6 महिन्यापासून बंद असणाऱ्या शाळा कधी सुरू होतील याची अद्याप शाश्वती नाही.याचा सर्वाधिक फटका मात्र शाळेत विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या खाजगी स्कूल व्हॅन चालकांना बसत आहे. पालकांच्या धावपळीच्या व व्यस्त दिनचर्या मध्ये आपल्या पाल्यांना शाळेत ने आण करण्याचे जबाबदारीचे आणि महत्त्वाचे कार्य “अंकल” या नावाने प्रशिध असणारे व्हॅन चालक आपल्या स्कूल व्हॅन सेवे द्वारे बजावत असतात.शाळा,विद्यार्थी,स्कूल व्हॅन हे जणू एक सूत्रच बनले आहे. अंबड शहरात अनेक नर्सरी,प्राथमिक,माध्यमिक शाळा आहेत.पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे जास्त आहे. ग्रामीण भागातील पालकही आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेतच मोठ्या प्रमाणात पाठवतात.अंबड शहराच्या आसपासच्या अनेक ग्रामीण भागातूनही हजारो विद्यार्थी नर्सरी ते माध्यमिक शिक्षणासाठी अंबड शहरात येत असतात.तसेच अंबड शहरातील काही खासगी इंग्रजी शाळा या शहराच्या बाहेर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील व अंबड शहरातील पालकही यासाठी विद्यार्थ्यांना ठराविक वेळेत शाळेत ने-आण करण्याचे महत्वपूर्ण कार्य हे स्कूल व्हॅन द्वारे पार पाडण्यास पसंतीक्रम देतात. हे महत्त्वाचे व जबाबदारीचे कार्य शेकडो अंकल आपल्या स्कूल व्हॅन द्वारे पाडत असतात. यातून त्यांना आर्थिक मोबदला मिळतो. परंतु गेल्या सहा महिन्यापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आवडते स्कूल व्हॅन अंकल यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उत्पन्न बंद असल्यामुळे हात ऊसणे व बँकेच्या कर्जाद्वारे घेतलेली व्हॅनचे हप्ते भरावे कसे? घर खर्च कसा भागवायचा? हे यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहे. अनेक स्कूल व्हॅन चालकांनी तर नाविलाजास्तच दुसरे व्यवसाय सुरू केले आहेत. आज ना उद्या शाळा लवकरात लवकर सुरू होतील या आशेवर व्हॅन चालक दिवस काढत आहे. विद्यार्थ्यांचे लाडके असणारे अंकल सध्यातरी हलाखीच्या परिस्थितीतून जात असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक