जालना जिल्हा

२०१८ ची खरीप पिकविम्याची रक्कम तात्काळ वाटप करण्याची मागणी

न्यूज जालना ब्युरो / जांबसमर्थ प्रतिनिधी /कुलदीप पवार

मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सन २०१८ ची खरीप पिकविम्याची रक्कम तात्काळ वाटप करण्याची मा.राज्यमंत्री अर्जुन खोतकर व मा आ संतोष सांबरे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी करण्यात आली आहे.


जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०१८ जनरल आयसीसीआय इन्शुरन्स कंपनीकडे भरलेला होता.या काळात महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांची पिके उद्वस्त झाली होती.राज्यशासनाने ३१ आक्टोबर २०१८ रोजी महाराष्ट्रातील १५१ तालूके दुष्काळग्रस्त जाहीर केले होते.यामध्ये जालना जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेश होता.

असे असून सुद्धा वरील कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त ५५ कोटी रुपये देऊन अन्याय केला होता.या संदर्भात पालकमंत्री राजेश टोपे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.


११फेब्रुवारी २०१९ रोजी मा.उच्च न्यायालयाने संबंधित शेतकऱ्यांना सहा आठवड्याच्या आत विमा रक्कम वितरीत करण्याचे आदेश दिले होते.परंतू अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना ही विम्याची रक्कम मिळालेली नाही.तरी मा.न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करण्याची मागणी मा.राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक