Breaking News
घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यातील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी भाजप ची मागणी

घनसावंगी प्रतिनिधी दि ११

घनसावंगी तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणीचे नायब तहसीलदार गौरव खैरनार व मंडळ अधिकारी काळे यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांनी हंगामात घेतली जाणारी ऊस,मोसंबी, केळी,सोयाबीन,बाजरी,तुर, मका आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे ऊस पीक पूर्णपणे पडले आहे केळी,मोसंबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कापुस पिकाचे फुलपाते व दोड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येणार आहे परिणामी या हंगामातील घेतलेल्या ऊस, केळी,मोसंबी,सोयाबीन, बाजरी,तूर,मका पिकाचे अतोनात नुकसान झाले असून अत्यल्प होणार आहे

त्यामुळे घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा

यावेळी निवेदन देताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प रमेश महाराज वाघ,माजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तौर,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अ.जा. सर्जेराव दादा जाधव,भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे,भाजप किसान जिल्हा सरचिटणीस कैलास शेळके,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद ढेंबरे,भास्करराव पांढरे,सुरेश पोटे,एकनाथ महाराज राठोड,सुरेशराव उगले,योगेश ढोणे,अर्जुन माळोदे,भाऊसाहेब देवडे,अमोल काळे,विलास चव्हाण,अमोल निर्मळ,अनिल जाधव,हरिभाऊ पाटोळे,सचिन पाटोळे,कैलास लांडगे,सुनील शेंडगे,राम भालेराव,सुनील गुढेकर,विशाल साबळे,बाबासाहेब वायाळ,प्रकाश रंधवे व उपस्थित भाजप कार्यकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक