जालना जिल्हा

आरोग्यमंत्र्याच्या जिल्ह्यात जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत मोठा आर्थिक व्यवहार!

न्यूज जालना ब्युरो न्यूज दि ११ गोर गरिब जनतेला खासगी रुग्णालयातही मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना सुरु केली. अनेक आजारांचा समावेश या योजनेत करुन अनेक खासगी रुग्णालये या योजनेशी संलग्नीत करण्यात आली. परंतु योजनेस रुग्णालये संलग्नीत करण्याच्या प्रक्रियेत होत असलेला अनागोंदी कारभार व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांकडून होत असलेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने समोर आला आहे. व्हाटसअपवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत जालना येथील महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत काम करणारे तीन अधिकारी दिसत असून एक डाॅक्टर या तीघांनी रुग्णालय योजनेशी संलग्नीत करण्याच्या नावाखाली घेतलेले चार लाख रुपये परत मागताना दिसत आहे. चार लाख रुपये दिल्यानंतर एक वर्ष उलटूनही प्रक्रिया पुर्ण न केल्याने संबंधीत डाॅक्टर समोर बसलेल्या तीघांनाही जाब विचारत असून यासाठी मला स्वत: आरोग्य मंत्र्यांना भेटावे लागत असल्याचे सांगत आहे. त्यामुळे तुम्ही चार लाख रुपये घेऊन वर्षभर काय केले ? असा प्रश्न विचारत डाॅक्टर चार लाख परत करण्याची मागणी करताना दिसून येत आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डाॅ. गुरुराज थत्तेकर यांना संपर्क केला असता त्यांचा भ्रमण ध्वनी बंद आला. आम आदमी पार्टीची कारवाईची मागणी जिल्हा समन्वयक गुरुराज थत्तेकर, जिल्हा प्रमुख अमित दरक व जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. स्वप्नील आपरे हे योजने अंतर्गत भ्रष्टाचार करीत असल्यामुळे त्यांना तत्काळ बडतर्फी करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बुधवारी ( दि.09 ) आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक