घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यातील मोसंबी पिकांचे त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळण्याची कृषी पदवीधर युवा संघटनेची मागणी

घनसावंगी तालुक्यातील मोसंबी पिकांचे त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळण्याची कृषी पदवीधर युवा संघटनेची मागणी

घनसावंगी/- तालुक्यातील मोसंबी पिकांचे त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळण्याची कृषी पदवीधर युवा संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात घनसावंगी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे सदरील निवेदनात म्हटले आहे की,गेल्या काही दिवसापासून तालुक्यातील मुख्य पीक म्हणून घेतल्या जाणाऱ्या मोसंबी पिकावर काळ्या डागांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. आंब्या बहरातील पीक बहुतांश प्रमाणात वाया गेले आहे.
ऐन काढणी अवस्थेत अशा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने मोसंबीच्या दरात खूप मोठी घसरण होत आहे.कोरोना रोगामुळे अगोदरच शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती क्षेत्रात सतत येत असलेल्या संकटामुळे शेतकरी नैराश्याच्या छायेत आहे.
त्यामुळे तालुक्यातील मोसंबी पिकांचे त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष आशिष पवार,विध्यार्थी सेलचे प्रवीण लोंढे,पंडित राठोड,अॅड.अभिजित पवार,विठ्ठल पवार,कैलास पवार,जनार्दन लोंढे यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक