Breaking News
परतूर तालुका

परतुर उड्डाण पूलाच्या कामाला गती मिळणार

 

न्यूज जालना / दीपक हिवाळे 

परतुर शहरातील उड्डाण पुलाचे काम गेल्या दोन तीन वर्षापासून चालू आहे. उड्डाण पूलाच्या रेल्वेगेट ते रेल्वेस्टेशन कामात रस्त्याच्या कडीला असलेले घरे दुकाने यांचा अडथळा येत होता. प्रशासनाने हे अडथळे दूर करून नागरिकांनी केलेल्या बांधकाचा मोबदला देत जलदगतीने काम करण्याच्या हालचाली सुरू केल्याने नागरिक व्यापार्‍यांनी आपापली अडथळे ठरणारी दुकाने काढून घेत उड्डाण पूलाच्या कामाला गती मिळणार असल्याचे दिसते. या मार्गावरील रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

आज सकाळी पोलिसांचा फौजफाटा व जेसीबी पाहून नागरिकांची एकच धावपळ उडाली. आपली दुकाने नुकसान होऊ नये म्हणून स्वत बांधकाम व दुकानातील सामान काढून घेतले.

शहरात बहुचर्चित उड्डाण पूलाच्या काम पूर्णत्वास नेल्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यात रेल्वेगेट ते रेल्वेस्टेशन दरम्यान उड्डाण पूल का रेल्वे स्टेशनकडे वळविण्यात आल्याने या मार्गावरील दुकाने रस्त्या रुंदीकरण करण्यासाठी कमी पडत असल्याने येथे काही व्यापारीच्या मालाकीच्या जागा होत्या तर काही नागरिकांनी या भागात अतिक्रमण केले होते.

या जागेचा वाद गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. त्यातच उड्डाण पूलाच्या कामाला सुरुवात झाली. उड्डाण पुलाचे मध्यखांब काही उभा करण्याचे काम चालू आहे. मात्र काम करतांना जागेची अडचण ठरत असल्याने बांधकाम पाडणे तातडीने काढणे गरजेचे झाले होते. या मालकीच्या जागेचा मोबदला देण्यात आला. मात्र दिलेल्या मोबदल्यात व्यापारी वर्गात समाधान झाले नसल्याचा सुर व्यापारी वर्गात आहे. या भागातील नागरिकांनी बांधकाम स्वत काढून घेतल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेत उड्डाण पूलाच्या कामाला गती मिळणार असल्याचे दिसते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक