घनसावंगी तालुका

भादली ३,पिंपरखेड २,मंगु जळगाव १ एकूण सहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

घनसावंगी तालुक्यातील तीन गावे मिळून सहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

घनसावंगी प्रतिनिधी / दि ११
घनसावंगी तालुक्यात शुक्रवारी एकूण सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून यात भादली ३,पिंपरखेड २,मंगु जळगाव १ असे एकूण सहा जणांच्या अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे


भादली येथील ३३ वर्षीय पुरुष,२० वर्षीय महिला, व ३ वर्षीय बालकांचा समावेश आहे,तर पिंपरखेड येथील३१ वर्षीय पुरुष व २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे दरम्यान मंगु जळगाव येथे ३२ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. एकूण सहा जणांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

दरम्यान जालना प्रयोगशाळाकडून दुपारी प्राप्त पॉझिटिव्ह अहवालात जिल्ह्यातील एकूण २६ जण पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे त्यात घनसावंगी तालुक्यातील सहा जणांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक