घनसावंगी तालुका

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे म्हणत बसवर दगडफेक !

न्यूज जालना ब्युरो दि ११ : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिदखेड पाटीजवळ गुंजकडे जाणाऱ्या बसेसवर दोन जणांनी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे घोषणा देत बसमधील प्रवाशी खाली उतरून दगडफेक करण्यात आली आहे ह्या प्रकरणी दोन जनावर घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
जाहिरात
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , जालना जिल्हयातील घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड गावाजवळ ही घटना घडली . अंबड आगाराची बस क्रंमाक ( एम.एच .२० बी एल २८७ ९ ) ही बस अंबडहून गुंज बुद्रूककडे शुक्रवारी ( ता .११ ) दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान जात असतांना सिंदखेड जवळ बसच्या समोर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या आहे . काल सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरीम स्थगिती दिल्याने नाराज झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाची मागणी करत बसच्या समोरील आणि मागील बाजूच्या काचा फोडल्या यामध्ये बसचे नुकसान झाले . बसमधील प्रवाशांना बसच्या खाली उतरवण्यात आले . दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .पोलीसांनी ही बस घनसावंगी बसस्थानकात लावली आहे . बसचालक जे . एस . हाकणे यांनी दोन जणांनी बसवर हल्ला केल्याचे सांगीतले . या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल आहे . पुढिल तपास पोलिसांकडून केला जात आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक