Breaking News
परतूर तालुका

संभाजी बिडी व तुकाराम बिडी त्वरित बंद करा अखिल भारतीय वारकरी मंडळाची परंतुरात मागणी

दिपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क
जगद्गुरु संत तुकाराम महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या नावे सुरू असलेले संत तुकाराम बीडी व छत्रपती संभाजी महाराज बिडीचे उत्पादन त्वरित बंद करून उत्पादन केलेला माल ताब्यात घेऊन महापुरुषांचे नावे धूम्रपानावर वापरणाऱ्या कारखान्यावर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन अखिल भारतीय वारकरी मंडळ परतुर तालुका कमिटीच्या वतीने तहसीलदार परतूर यांना तारिख ११/०९ /२०२० रोजी देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,की तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथून झुंबरलाल गोवर्धन या कंपनीकडून उत्पादित होणाऱ्या बीडीच्या कट्ट्यावर वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा वापरून महाराष्ट्रातील लाखो वारकरी व भाविकभक्तांच्या श्रध्देला ठेच पोहोचवण्याचे निच कृत्य केले आहे .त्याच प्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील साबळे वाघिरे अँड कंपनी यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा वापरून समस्त शंभूप्रेमी युवक व महाराष्ट्रातील असंख्य शंभू भक्तांचे देखील भावना दुखावल्या आहेत.
प्रशासकीय पातळीवरती आपण ताबडतोब या उत्पादन निर्मितीस बंदी आणावी व वितरित केलेल्या संपूर्ण बिडी उत्पादनाचा माल ताब्यात घ्याण्याची विनंतीही याव्दारे केली असून शेवटी वारकरी संप्रदायाचे संत, महात्मे व महाराष्ट्रातील युगप्रवर्तक महापुरुषांची बदनामी केल्या बद्दल तात्काळ कारवाई करावी अन्यथा अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आसाही ईशारा निवेदनात दिला आहे.दिलेल्या नावेदनावर हभप मारुती महाराज दांगट ,हभप महादेव महाराज सुरुंग ,नामदेव महाराज शास्त्री शिवणगिरीकर, संजय महाराज फोके, ह भ प गणेश महाराज सुरुंग ,हभप गणेश महाराज जाधव, हभप उत्तम महाराज वाघमारे ,हभप महादेव महाराज वैद्य, हभप विठ्ठल महाराज कदम ,हभप महादेव महाराज मोहिते ,हभप ऊद्धव महाराज बरकुले व आदी वारकरी संप्रदायातील नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक