घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगाव, राजाटाकळी सह घनसावंगी तालुक्यात नवीन आठ जण पॉझिटिव्ह

घनसावंगी प्रतिनिधी दि ११ :- शुक्रवारी सायंकाळी साडे पाच च्या सुमारास आलेल्या अहवालात जिल्ह्यात एकूण ३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे यात घनसावंगी तालुक्यातील आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

यामध्ये राजा टाकळी १ ,घनसावंगी २ ,पिंपरखेड २ ,कुंभार पिंपळगाव १ ,अरगडे गव्हाण २ ह्या गावाचा समावेश आहे


राजाटाकळी येथील १९ वर्षीय महिला , घनसावंगी येथे ३३ वर्षीय पुरूष व ६५ वर्षीय पुरुष ,पिपरखेड येथे ५० व ६५ वर्षीय महिला ,अरगडे गव्हाण येथील ३४ व ५७ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे .
याबाबत आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचे आरोग्य अधिकारी यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक