देशविदेश

जालन्यात 30 किलो चांदी जप्त,चार आरोपी ताब्यात

जालन्यात 30 किलो चांदी जप्त,चार आरोपी ताब्यात

न्यूज जालना ब्युरो दि १२

जालन्यातील नागेवाडी टोल नाक्याजवळ दहशतवाद विरोधी पथक आणि चंदनझिरा पोलिसांनी सापळा लावून आज शनिवारी सकाळी लाखो रुपये किमतीची 30 किलो चांदी जप्त केली आहे.याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मोटार कारही जप्त करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. औरंगाबाद येथून कारद्वारे सदर चांदी नांदेड येथे नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पोलीस पथक आणि चंदनझीरा पोलिसांनी ही कारवाई केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक