परतूर तालुका

परतुरला सहाय्य्क फौजदार रविंद्र ठाकरे यांची गरज -परतुर पत्रकार संघाची मागणी

दीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्क
परतुर येथे कार्यरत असलले कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र ठाकरे यांची परतुर येथून आठ दिवसापूर्वी जालना जिल्ह्य मुख्यालय तड़काफड़की बदली करण्यात आली आहे. वास्तविक पाहता ठाकरे परतुर येथे रुजू झाल्या पासून परतुर येथील सर्वसामान्य नागरिक ते आम्ही सर्व पत्रकाराला वेळोवेळी त्यांचे सहकार्य लाभले आहे गुन्हाच्या तपसा बाबतीत त्यांची कामगिरी चांगली असल्याने त्यांचा तापसावरुण दिसून येते तीन महिन्यापूर्वी सिंगोना पाटी जवळ झालेल्या खुनाचा प्रकरणत आणि आंबायेथील 22 वर्षीय खुनाचा प्रकरणत ठाकरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदत शिवाय 24 तासाच्या आत आरोपिचा शोध घेऊन ताब्यात घेतले होते.

अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची परतुर शहरला गरज आहे अशा स्थितीत त्यांची परतुर येथून तड़काफड़कीने बदली का करण्यात आली हा एक प्रश्नच आहे मात्र परतुर शहरा चे सुजान नागरिक आणि पत्रकार या नात्याने परतूर पत्रकारांनी विनंती करत लोकभावना लक्ष्यात घेऊन रविंद्र ठाकरे यांची जिल्ह्य मुख्यालयत झालेली बदली रद्द करुण त्यांना पुन्हा परतुर येथे पदभार देण्यात यावा.असे उपविभागीय अधिकारी परतुर यांच्या मार्फत जिल्ह्य पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदानात म्हटले आहे या निवेदावर परतुर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष आशिष गारकर पत्रकार संघाचे सचिव भारत सवने अजय देसाई सय्यद वाजेद अशोक साकळकर आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक