जालना जिल्हा

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ऑनलाइन त्रैभाषिक गझल मुशायरा

न्युज जालना ब्युरो दि १२

भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा जालना आणि मराठी विभाग, जेईएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त त्रैभाषिक गझल मुशायरा संमेलन आयोजित करण्यात आले आहे.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून मागील दोन वर्षांपासून हे आयोजन केले जात आहे.

यंदा हे तिसरे संमेलन कोरोणा संकटामुळे ऑनलाइन होणार आहे. १७ सप्टेंबर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता युट्युब आणि फेसबुक या माध्यमांतून हे संमेलन होणार आहे.यापूर्वीच्या गझल मुशायऱ्या मध्ये सुप्रसिद्ध शायर दिवंगत शम्स जालनवी, जयदीप विघ्ने, अविनाश कासंडे, इक्‍बाल मिन्ने, दास पाटील, चेतन सैंदाणे, आत्माराम जाधव, विशाल राजगुरू, आनंद पेंढारकर, निशांत पवार, अशोक खेडकर आदींनी सहभाग घेतला आहे.या निमित्ताने मागील वर्षी वर्षभर गझल मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले गेले.

याहीवर्षी जेईएस महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने गझल ई प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु आहे.यावर्षी होणारे गझल मुशायरा संमेलन सुप्रसिद्ध गझलकार डॉ. इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली होत असून याप्रसंगी मुंबई येथील सुप्रसिद्ध गझलकार प्रशांत वैद्य, आत्माराम जाधव ( परभणी), राधिका प्रेमसंस्कार ( मुंबई), डॉ. मोहन बाभुळगावकर (औरंगाबाद) आणि पवन ठाकूर ( सिल्लोड) हे नामवंत गझलकार आपल्या रचना सादर करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक