जाफराबाद तालुका

युगधंर प्रतिष्ठाण व कै बापूराव पाटील कळंबे सेवाभावी संस्थेच्या वतीने टेंभुर्णीतील 192 कोरोना योध्याना सन्मानित


टेंभुर्णी/सुनील जोशी
कोरोना काळात ग्राउंड लेव्हल ला काम करणाऱ्या योध्यांचा यथोचित सत्कार आयोजीत करून युगंधर प्रतिष्ठाण ने राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन तहसीलदार सतीश सोनी यांनी शनिवारी ता.12 केले. टेंभुर्णी ता जाफ्राबाद येथील युगधंर प्रतिष्ठाण व कै बापूराव पाटील कळंबे सेवाभावी संस्थेच्या वतीने टेंभुर्णीतील 192 कोरोना योध्याना कोरोना वारीयर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

येथील ग्रामीण रूग्णालयात आयोजीत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून तहसीलदार सतिश सोनी बोलत होते. यावेळी उदघाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष रामधन कळंबे होते तर यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. पायघन, पंचायत समिती सदस्य तथा भाजप ओबीसी सेल तालुकाध्यक्ष प्रदिप मुळे, सरपंच गणेश धनवई, वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रकाश साबळे, ग्रामविकास आधिकारी सुखदेव शेळके, पोलीस उपनिरीक्षक डी. एस. साखळे, कलाबाई काळे फाऊंडेशन च्या अध्यक्षा सरला काळे, गजानन काळे, वरिष्ठ सहाय्यक सतीश चंदनशिवे यांची प्रमुख उपस्तिथी होती.यावेळी बोलतांना तहसीलदार सोनी म्हणाले कि सामाजिक बांधीलकी चे भान राखून युगंधरने ग्राउंड लेव्हलला काम करणाऱ्या योध्यांचा केलेला सन्मान कौतुकास्पद आहे.कोरोना चा धोका अजून संपला नसून सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

यावेळी रामधन कळंबे, डी एस पायघन,डॉ प्रकाश साबळे, अलकेश सोमाणी,संजय राऊत, रेखा सपकाळ,रंजित पाटील यांनी ही मनोगत व्यक्त करून युगंधर च्या उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक युगंधर चे अध्यक्ष विनोद कळंबे यांनी केले.युगंधर प्रतिष्ठाण माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली.सुत्रसंचलन सुधाकर चिंधोटे आणि सचिव धनंजय मुळे यांनी तर आभार ज्ञानेश चव्हाण यांनी मानले.
यावेळी ग्रामीण रुग्णालय कर्मचारी, पोलीस, होमगार्ड, आशा वर्कर्स, अंगणवाडी कार्यकर्ती,मदतनीस, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी,ग्राम संसद कर्मचारी,कोविड सेंटर टीम, खाजगी डॉक्टर अशा 192 जणांना स्मृतिचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष शेख अल्ताफ, गोपाल बांगड, प्रदिप जैस्वाल, ज्ञानेश चव्हाण,बाबासाहेब जाधव, शंकर शेळके, धोंडीराम कवठकर, संदिप दांडगे, वसंत टोपरे, सुरेश चंदनशिवे,सागर अंधारे, अनिल सातभाई, प्रा दत्ता देशमुख, शिवराज सपाटे, वसंत उगले, सुनील जोशी, जग्गू शर्मा, श्रीरंग चौरे, आदींनी परिश्रम घेतले.


कोरोना च्या पार्श्वभूमीवर सुरक्षीत अंतर राखत या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.मास्क आणि सँनीटायझर ची व्यवस्था करण्यात आली होती.प्रत्येक कर्मचाऱ्यास त्याच्या नावाचे स्मृतिचिन्ह देण्यात आले


ग्राउंड लेव्हल ला काम करणाऱ्या आशा, अंगणवाडी कार्यकर्ती,पोलीस, होमगार्ड,ग्राम संसद कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय टीम, वितरण कंपनी टीम, खाजगी डॉक्टर्स या सर्वांनी कोरोना काळात केलेल्या अविरत सेवेची दखल युगंधर प्रतिष्ठाण ने घेतल्याने या सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक