Breaking News
भोकरदन तालुका

शिक्षकांनी उचलला विडा वाड्या-वस्त्यावर जाऊन विद्यार्थ्यांकडुन गिरवुन घेताहेत आॅनलाईन धडे

पिंपळगाव रेणुकाई दि १२

सर्वत्र कोरोनाच्या भितीने जवळपास सहा महिण्यापासुन शाळेला लागलेली कुलप शासन उघडायला तयार नाही. त्यातच आदिवासी आश्रमशाळेचा विचार न केलेला बरा.कोरोनाच्या धास्तीने शाळेवर मोठा परिणाम झाला.अद्याप शासनाने हात टेकले आहे.

शहरीभागातील मुलांना आॅनलाईन पध्दत्तीने शिक्षण देणे सुरु आहे. माञ वस्त्या-तांड्यावरील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचित राहावे लागतय आॅनलाईन शब्द कधीही कानावर न पडलेले आदिवासी विद्यार्थी पार गांगरुन गेले.त्यातच आॅनलाईन म्हणजे काय ही शिक्षण पध्दत्ती कशी आहे.काय करावे या सम्रंभात असताना आदिवासी आश्रमशाळेतील उपक्रमशील शिक्षक सुनिल एस लोखंडे यांच्या सह त्यांचे सहकारी यांनी अनेक विषयांवर मात करुन या संकटकाळात तोडगा काढला आहे.

विद्यार्थ्यांना मोबाईल,लॅपटाॅप,संगणकाद्वारे कसे शिक्षण द्यायचं याचे धडे ते देवु लागले. आदिवासी आश्रमशाळा जळगांव सपकाळचे दोन शिक्षक रोज वस्त्या-वाड्यावर जावुन गर्दी न होवु देता पाच-दहा विद्यार्थ्यांना आॅनलाईन पध्दत्तीचं शिक्षण देण्याचा प्रभावीपणे प्रयत्न करत आहे.यामुळे या होतकरु उपक्रमशील शिक्षकांचे सर्वञ कौतुक होत आहे. याचप्रमाणे . सततच्या कोरोना विषाणूचा संसर्गामुळे या वर्षी आश्रमशाळा सुरू होणार की नाही ही चिंता विद्यार्थी , शिक्षक, व आदिवासी पालकांना सतावत आहे, आॅनलाईन शिक्षण हे आदिवासी विद्यार्थ्यांना परवडणारे नाहीच कारण या मध्ये अनेक समस्या आहेत,जसे की अनेक विद्यार्थ्यांकडे आॅनराईड फोन नाहीत, असतील तर लाईट नाही , नेटवर्क नाही, हे सर्व असेल तरी विद्यार्थ्यांना तो मोबाईल वापरता येत नाही.हे सर्व लक्षात घेऊन भोकरदन तालुक्यातील अनुदानित पोस्ट बेसिक आश्रमशाळा जळगाव सपकाळ येथील शिक्षकांनी आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना सिल्लोड तालुक्यातील उडणगाव,अभई, हाळदा,डकला,रहिमाबाद,जळकी वसई,आमसरी. भोकरदन तालुक्यातील धावडा, विझोरा वालसावगी,कुंभारी वाकडी. जळगाव जिल्ह्यातील तोडापुर ,फत्तेपुर,ठाणा, बुलढाणा जिल्ह्यातील धाड,खोर भोकर आदिवासी पाड्यावर विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन शैक्षणिक व कोविड संदर्भात मार्गदर्शन करत आहे याचं बरोबर विद्यार्थ्यांना. युट्युब व्हाट्स अॅप , दिक्षा अॅप. कसे वापरावे याची माहिती देत आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना आजच्या कोविड परिस्थितीत सामाजिक अंतर राखण्यासह ,स्वच्छतेचे महत्व पटवून देत आहे.हे करत असतानाच शिक्षक कोविड संदर्भात शासनाच्या सर्व सुचनेचे पालन करीत आपले ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे.या मध्ये माध्यमिक.शिक्षक सुनिल एस लोखंडे , आर.व्ही दांडगे , के एस साळवे , ए.बी चोरमारे सर,प्राथमिक शिक्षक एस.एस जाधव , एस एन कोरडे सर,व्हि एस सोनुने , व्हि बी पंडित,एस यु.रोजेकर एम बी चित्ते हे सर्व शिक्षक ,प्रकल्प अधिकारी श्री. मेहत्रे साहेब .प्रशासकीय अधिकारी डॉ शालिकराम गोरे सर, माध्यमिक मुख्यध्याक जे.व्हि कराड, ए ए सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक