भोकरदन तालुका

वालसावंगीतील विजेच्या प्रश्नाबाबत शिवसेना आक्रमक.!

शिवसेनेकडून महावितरणाच्या विरोधात आदोंलनाचा इशारा

वालसावंगी / ज्ञानेश्वर गवळी दि १३

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गाव हे सहा महिन्यापासून अंधारात असल्याने महावितरण  विभागाकडून सुरळीत करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने गावात रोहित्रास वारंवार बिघाड होवून रोहित्र वारंवार नादुरूस्त होत आहे

त्यामुळे  पुर्ण गाव अंधारात राहत आहे  त्यामुळे गावात अंधाराचे  सावट पसरल्याने चोरीचे घटना घडू लागल्या आहे तरीही महावितरण विभागाला कुठल्याही प्रकारची जाग येताना दिसत नाही   महावितरण विभागाकडून   विजपुरवठ सुरळीत न केल्यास शिवसेनेकडून सिनेमास्टाईल आदोंलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाआहे

वालसावंगी हे भोकरदन तालुक्यातील सर्वांत मोठे विस हजार लोकसंख्येचे गाव असतानाही गावात वारंवार अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे तसेच अंधारामुळे गावात डेंगी रोगाची लागण होत आहे तसेच पिठाची गिरणी वारंवार बंद राहत, मुलांच्या अॉनलाईन शिक्षणात बट्याबोळ झाला आहे,  तसेच शेतकरी व ग्राहकांना विजेची वाट पाहत बँकेत ताटकळत उभे राहावे लागत असतानाही महावितरण विभाग व  लोकप्रतिनिधी सोयीस्करपणे दुर्लक्ष करित आहे

दरम्यान महावितरण विभागाकडून तसेच गेल्या दोन वर्षापासून गायरान जमिनीवरील दोन  वर्षापासून  महावितरण विभागाकडून हाती घेण्यात आलेले  ३३ केंव्ही केंद्राचे काम सतत बंद राहत असल्याने तसेच वरिष्ठाच्या सुचनावरून कामात हालगर्जीपणा आणल्याने वालसावंगीसह परिसरात विजेचा प्रश्न बिकट बनला आहे  त्यामुळे नागरिकांना अंधाराशी सामना करावा लागत आहे  याकडे महावितरण विभाग जालना यांनी तातडीने लक्ष घालून विजपुरवठा सुरळीत करावा नसता बुलडाणा ते अजिंठा रोडवरील वालसावंगी फाटा येथे  वालसावंगी सर्कल शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको आदोंलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना तालुका संघटक किरण कोथलकर, गणेश दामधर, संदिप लोखंडे , तुकाराम फुसे , भगवान पायघन , सुनील मोकासरे, आत्माराम पवार , यांच्यासह शिवसैनिकांनी केला आहे

गाव तीन महिन्यापासून अंधारात आहे तसेच ३३ केंव्ही केंद्राचे काम संथगतीने सुरू आहे त्यामुळे गावात चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे याकडे महावितरण विभाग व लोकप्रतिनिधी यांनी तातडीने लक्ष घालावे नसता शिवसेना स्टाईलने आदोंलन छेडण्यात येईल.

किरणराजे कोथलकर शिवसेना संघटक भोकरदन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक