घनसावंगी तालुका

…अन तो पूल कालव्याच्या पाण्यात कोलमडला ,कुठलीही जीवितहानी नाही

तिर्थपुरी / प्रतिनिधी दि १३ जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील एकलहेरा व खापरदेव हिवरा गावातील शेतकऱ्यांना शेतात येण्या – जाण्यासाठी या पुल बांधण्यात आला होता . पुलाच्या मध्यभागी आधारासाठी विटांच्या पिलरची पाण्याने झीज झाल्याने तो कोलमडला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.या पूलाचे बांधकाम 1970 च्या दरम्यान करण्यात आलेले आहे जायकवाडीच्या धरणाच्या डाव्या कालव्याजवळ सुमारे 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल शनिवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला . दुपारच्यावेळी दुर्घटना घडल्याने पुलावर रहदारी नसल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली आहे . या पूलावर सकाळी आणि सायंकाळी जास्त रहदारी असते . दुपारची वेळ असल्याने रहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे .
कालव्याला कुठलाही धोका नाही सध्या डाव्या कालव्यातून 1600 क्यूसेक क्षमतेने पाणी वाहत होत असून पूल कोसळल्याने कालव्याला कुठलाही धोका नसल्याचे जायकवाडी डाव्या कालव्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक