जालना जिल्हा

देवमूर्ती शिवारात आढळला आखुड बोटांचा सर्पगरुड

न्यूज जालना ब्युरो दि १३

जालना तालुक्यातील देवमुर्ती परिसरात आढळला आखुड बोटांचा सर्पगरुड त्यास पांगुळ सापमार गरुड असे पण म्हणतात. आज रविवार रोजी नेहमी प्रमाणे निसर्ग भटकंती आणि वन्यजीव छायाचित्रणासाठी देवमूर्ती परीसरात वन्यजीव छायाचित्रकार ज्ञानेश्वर गिराम आणि राजेंद्रसिंह गौर पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांचेसह गेले असता सदरील पक्षी जालना शहर परिसरात एकटा-दुकटा कधीतरीच दिसत असे परंतू आता निरीक्षणा अंती असे दिसून आले की त्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे कारण पहिल्यांदाच हे तीन पक्षी मागील आठवड्यात एका ठिकाणी आढळून आले होते. आज सदरील शिकारी पक्षी याने रंग बदलणारा सरडा याची शिकार केली आणि त्यास फाडून खातांना आणि गिळतानाचे दुर्मिळ छायाचित्रण राजेंद्रसिंह गौर आणि ज्ञानेश्वर गिराम यांनी टिपले. अतिशय निर्दयीपणे त्यास तीक्ष्ण चोचीने आणि नखाने जिवंत असताना फाडले आणि गिळून टाकले. निसर्गातील या अनोख्या प्रसंगांची नोंद कॅमेऱ्यामध्ये घेतली आणि पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला.

रंग बदलणाऱ्या सरडयाची शिकार करतांना कॅमेऱ्यात केला कैद

पक्ष्यांची थोडक्या माहिती.
मराठी नाव : पांगुळ सर्पगरुड किंवा आखूड बोटांचा सापमार गरुड (इंग्लिश: Short-toed snake Eagle हिंदी: सापमार गरुड ) हा एक शिकारी पक्षी आहे. तो मुख्यतः साप खातो साप नाही मिळाला तर इतर सरडे,पाली यांची शिकार करतो आणि तीक्ष्ण नखात पकडतो टोकदार चोचीने फाडून खातो तर साप तोंडाकडून गिळतो.


हा पक्षी आकाराने घारीपेक्षा मोठा असतो. याचा रंग काळा असून छातीखालचा रंग पांढरा असतो. छातीवर गडद बदामी रंगाच्या काड्या.घुबडसारखे मोठे डोके.भेदक नजर असणारे पिवळे डोळे पहाताच भीतीदायक वाटते. उडताना खालचा भाग धूसर चंदेरी दिसतो. डोके काळसर. शेपटीवर काळपट आडवे पट्टे.(नेहमी ३ पट्टे) पायांवर पिसे नसतात. चेहऱ्यावर केसांसारखी दिसणारी पिसे. लहान पक्षी उदी रंगाचा. नर-मादी दिसायला सारखे असले, तरी मादी नरापेक्षा मोठी असते.भारतात निवासी विरळ जंगले, माळराने आणि समुद्रकिनारे इ ठिकाणी आढळतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक