भोकरदन तालुका

सकल मराठा क्रांती मोर्चाची भोकरदन येथे बैठक संपन्न

मधुकर सहाने : भोकरदन

आज सकल मराठा क्रांती मोर्चाची भोकरदन येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत उद्या होणार्या नियोजीत नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
जिल्हात 144 लागु असल्याने पोलीस प्रसाशनाच्या विनंतीनुसार समाजाच्या वतीने काही मोजके समन्वयक उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी जातील असा सर्वानुमते निर्णय बैठकीत झाला असुन तालुक्यातील तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की कुणीही उद्या भोकरदनला निवेदन देण्यासाठी येऊ नये.
आपणास लवकरच पुढील दिशा ठरवण्यासाठी पुढील बैठकीची तारीख कळवण्यात येईल.असे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीव्दारे कळवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक