भोकरदन तालुका

चौविस लाख निधी असलेल्या पाणंद रस्त्याला लोकवर्गणीचा अाधार !

जळगाव सपकाळ ते अाडगांव पाणंद रस्ता.

जळगाव सपकाळ (ता भोकरदन प्रतिनिधी )दि १४ :—भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ ते अाडगांव या तीन किलोमीटर पाणंद रस्त्याचे काम परिसरातील शेतकर्‍यांनी दोन वेळेस दीड लाख रुपये लोकवर्गणी जमा करुन लोकसहभागातुन पुर्ण करत अाहे यामध्ये दळणवळणासाठी रस्ता सुकर व्हावा यासाठी रस्ता परिसरातील शेतकरी अजुन प्रयत्न करीत अाहे माञ या रस्त्यासाठी सन २०१२मध्ये ग्रामपंचायतीने महाराष्टृ ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन बांधकाम व खडीकरणासाठी प्रस्ताव सादर केला होता व प्रस्तावाला दि.१८/४/२०१२मध्ये प्रशासकीय मान्यता मिळुन रोजगार हमीतुन चौवीस लाख पन्नास हजार रुपये निधीची तरदुत करुन मंजुरी मिळाली होती

परंतु रोजगार हमी योजनेतुन या रस्त्याचे काम न होताच संबधीत कंञाटदाराने संगनमताने तीन ते चार लाखाचे बिले उचलुन घेतले बाकी राहिलेले रस्त्याचे कामच केले नाही त्यामुळे अखेर शेतकर्‍यांनी लोकवर्गणी जमा करुन रस्ता बनवण्यासाठी सात वर्षापासुन टप्पया टप्याने रस्ता बनवत अाहे माञ रस्ता बनवण्यासाठी सात वर्षापुर्वी रोजगार हमी योजनेतुन प्रशासकीय मान्यता मिळुनही व रोजगार उपलब्ध असुनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्ता अपुर्ण अवस्थेत राहिल्याने अखेर शेतकर्‍यांनी लोकवर्गणी करुन रस्ता बनवत अाहे

त्यामुळे याकडे संबधीत अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी येथील शेतकरी अनिल सपकाळ,नितीन सपकाळ,गणेश मुठ्ठे,तेजराव मुठ्ठे,रवि सपकाळ,विनोद सपकाळ,देविदास सपकाळ,प्रशात बुरुकुले,रामधन महेर,गजानन सपकाळ यांनी केली अाहे.

या पाणंद रस्त्यासाठी माझ्या कार्यकाळात २०१२ मध्ये रोजगार हमी योजनेतुन निधी मंजुर झाला होता परंतु काम झालेच नसल्याने अखेर शेतकर्‍यांनी लोकवर्गणी करुन रस्ता दुरुस्त करीत अाहे

माजी सरपंच डाॅ.शालीकराम सपकाळ

तेजराव मुठ्ठे शेतकरी

या पाणंद रस्त्याचे अाम्ही शेतकर्‍यांनी दोन वेळेस लोकवर्गणी जमा करुन खडी व मुरुम टाकला माञ निधी असतानाही रस्ता झाला नसल्याने शेतकरी वर्गातुन नाराजी व्यक्त होत अाहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक