Breaking News
जाफराबाद तालुका

अकोलादेव येथे १६० शेतकरी कर्ज माफी पासून वंचीत,शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात !

अकोलादेव / बी डी सवडे दि १४ जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील महात्मा फुले कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पात्र शेतकरी यांचे दोन लाखांपर्यंतचे १६० शेतकर्‍यांचे कर्ज माफी पासून वंचीत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. पिक कर्ज मिळावे यासाठी शेतकरी बँकांचे वारंवार उंबरठे झिजवत आहे.

बँका मात्र शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. जोपर्यंत शासन कर्ज माफी पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैस वर्ग करीत नाही तोपर्यंत बँका शेतकऱ्यांना पिक देणार नसल्याची ठाम भूमिका बँक प्रशासनाने घेतल्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली असल्याने शेवटी या सर्व शेतकऱ्यांनी जो पर्यंत आमचे कर्ज माफ होत नाही तोपर्यंत आम्ही दि. २५ सप्टेंबर २०२० पासून महाराष्ट्र बँक शाखा टेंभुर्णी येथे घेराव घालून जल समाधी आंदोलन करण्याचा इशारा देवून जालना जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, पालक मंत्री राजेश टोपे, यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

विषय मुख्यमंत्री यांच्या कानांवर टाकू – पालकमंत्री टोपे

याबाबत पालक मंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ दखल घेऊन सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रकरण कशामुळे रखडली हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काणावर घालून योग्य तो प्रयत्न करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असे न्यूज जालना शी बोलताना सांगितले

जो पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्याला कर्ज माफीचा लाभ दिला जात नाही. व बँका आम्हाला पिक कर्ज देत नाही यामुळे आम्ही सर्व शेतकरी बँकेला घेराव घालून जल समाधी आंदोलन करणार आहे. त्रस्त शेतकरी रघुनाथ भावराव कदम.   

ज्या शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज माफ झाले आहे. आणी ईतर बँकेचे कर्ज माफी बाकी आहे अशा शेतकऱ्यांची माहीती बँकांनी पुन्हा अपलोड केल्यास शेतकरी कर्जमुक्ती चा लाभ मिळणार आहे.

जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक