घनसावंगी तालुका

कांदा बियाने उगवले नाही :जिल्हाकृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार

प्रतिनिधी / पिंपरखेड दि १४ घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु येथील दहा शेतकऱ्यांनी घेतलेले कांदा बियाणे हे उगवले नसल्याने याबाबत जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करत कारवाई ची मागणी केली आहे . खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकर्यांनी उन्हाळी कांदा लागवडी साठी एका सिडस बियाणे खरेदी केले होते ते बियाणे अनेक दिवस होऊनही उगवले नसल्याने बियाणे बनावट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे याबाबत सदर्भित कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळण्याची मागणी एका तक्रारीव्दारे केली आहे. दरम्यान एक निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवदेनावर धर्मराज आंधळे, उद्धव सिरसाट,विष्णु सिरसाट,चंदर डाेईफाेडे, तुळशीराम सिरसाट,रामेश्वर तांदळे,राजमाेहम्मद तांबाेळी,अर्जुन सिरसाट यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक