अंबड तालुका

मार्डी ग्रामस्थांचे वीज जोडणी बाबत महावितरणला साकडे

अनिल भालेकर/अंबड दि १४

अंबड शहरापासून जवळच असणाऱ्या मार्डी ग्रामस्थांना विद्युत पुरवठा च्या अनियमिततेबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या मार्डी या गावी चिंचखेड येथील सब स्टेशन मधून विद्युत पुरवठा केला जातो. परंतु सततच्या वीज खंडित होण्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिकाचे पाणी वाचून नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थी, महिला यांना सततच्या वीज खंडित होत असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे सध्या चिंचखेड येथून केला जाणारा विद्युत पुरवठा मध्ये बदल करून अंबड येथील म्हाडा कॉलनी जवळील सब स्टेशन मधून मार्डी या गावाला विद्युत पुरवठा करण्यात यावा यासाठी ग्रामस्थांनी सोमवारी ( 14 सप्टेंबर) महावितरण कार्यालयाला निवेदन सादर केले. निवेदनावर प्रकाश मुंजाळ (सरपरंच) विष्णु राऊत (उपसरपंच) बळीराम भडक, अरुण मोटकर, किशोर गायकवाड, कपिल मुंजाळ, सलीम सय्यद, किरण बनसोडे आधी ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक