बदनापूर तालुका

बदनापुरमध्ये भाजपा युवा मोर्चा वतीने जलसमाधी आंदोलन..!

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाठ दि १५

बदनापूर तालुक्यातील रोशनगाव मंडळांमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन तब्बल अडीच महिने होऊन गेले तरी देखील सरकारकडून प्रशासनाकडून कुठलीही मदत शेतकऱ्यांच्या पदरी पडली नाही त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या वतीने आमदार नारायण कुचे यांच्या मार्गदर्शनाखाली रोशनगाव च्या पुलाजवळ लहुकी नदीच्या पात्रात पाण्यामध्ये जाऊन जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे अशा पद्धतीचे घोषणा देऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलना मध्ये पाण्यामध्ये जाऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी गणेश कोल्हे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नंदकिशोर शेळके तालुका सरचिटणीस भास्कर पाटील घणघाव कृष्णा खरात बद्री खरात सरपंच विष्णु खरात ,अर्जुन खरात ,राहुल खरात ,महेश गाडे ,सोपान खरात, संदीप खरात, शरद अवघड ,अमोल चव्हाण ,कल्याणराव काळे यांची उपस्थिती होती या आंदोलनाला आमदार नारायण कुचे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली शेवटी मंडळ अधिकारी कळकुंबे यांनी आंदोलन करण्याचे निवेदन स्वीकारले आणि आंदोलन थांबवण्यात आले या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत करावी नसता यापुढच्या आंदोलन याहीपेक्षा उग्र असेल असा इशारा आंदोलन करते यांनी निवेदनाद्वारे सरकारला दिलेला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक