जालना तालुका

दुकान फोडणा-या तिघांपैकी दोन फरार तर एक पोलीसांच्या ताब्यात.

बबनराव वाघ,उपसंपादक

रामनरगर/प्रतिनीधी : जालना तालुक्यातील रामनगर येथील सावरगाव रोडवरील न्यु शुभमंगल किराणा दुकान मंगळवारी सकाळी 3 वाजेदरम्यान शटर तोडुन फोडण्याच्या प्रयत्न केला परंतु यश मिळाले नाही व तर एक पोलासांच्या ताब्यात अडकला व दोघे पळुन जाण्यात यशस्वी झाले.

अशा पद्धतीने शटर उचकाटुन चोरट्यांनी दुकानात केला प्रवेश

रामनगर येथील मुंदडा यांचे न्यु शुभमंगल किराणा दुकान मंगळवारी सकाळी 3 वाजे दरम्याण फोडत असतांना शेजारी रहाणारा संतोष गणपत पवार याने बघितले त्याच्या सोबत त्याचे वडील होते परंतु चोरांची संख्या कीती याचा अंदाजा लागत नव्हता. यावर संतोषने तात्काळ पोलीस चौकी गाठुण राञीच्या गस्तीवर असलेले पोहेकॉ प्रकाश जाधव, पोकॉ बाळु ढाकणे, चयनसिंग नागलोत,अविनाश मांटे, ग्रहरक्षक दलाचा मगर यांना माहीती दिली. सर्वांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता दुकानाचे शटर उचकाटुन आत गेलेला सचिन गायकवाड रा. चिलमखा पिंपळगाव ता.देवळगाव राजा जि. बुलढाणा सापडला व अन्य दोघे जे पहारा देत होते त्यांनी पोलीसांना बघुन पलायन केले. परंतु संतोष पवार याची हुषारी व मौजपुरी पोलीसांनी तात्काळ घेतलेली दखल यांने विजय मुंदडा यांचे होणारे मोठे नुकसान बचावले गेले.

मौजपुरी पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध गुन्हा दाखल करुण मेडीकल तपासनी साठी घेवुन गेले होते व सकाळी न्यायालयात हजर करणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक