Breaking News
जालना जिल्हा

अवैध गुटख्याचा ट्रक गोंदी पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने पकडला

34 लाखाचा गुटखा आणि 17 लाखाचा ट्रक, असा 51 लाखाचा मुद्देमाल जप्त न्यूज जालना ब्युरो दि १५ गोंदी पोलिसांची मंगळवारी सकाळी 8.00 वा. बीड ते औरंगाबाद रोडवरील गहिनीनाथनगरजवळ पाठलाग करून कारवाई.भरधाव वेगाने जात असलेल्या या ट्रकचा (क्र. केए-56, 5413) संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करून पकडला. झाडाझडती घेतली असता, या ट्रकमध्ये वरच्या बाजूला कुजलेल्या ज्वारीच्या 23 गोण्या होत्या, त्याखाली गोवा -1000 गुटख्याच्या 207 गोण्या आढळून आल्या. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, अम्बडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभय भास्करराव देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, पोहवा. भास्कर आहेर, नारायण माळी, नितीन खरात, गृहरक्षक दलाचे जवान गिरी यांची कामगिरी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक