Breaking News
घनसावंगी तालुका

मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून तात्काळ निर्णय घेण्यात यावा

सकल मराठा समाजाचे तहसिलदार नरेंद्र देशमुख यांना निवेदन

कुंभार पिंपळगाव /दि १५

काळात मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला अनाकलनीय व अनपेक्षितपणे न्यायालयाने दिलेल्या स्थगिती व हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सुपूर्त केल्याने पुढील निर्णय येईपर्यंत शिक्षणात व नोकरीमध्ये मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा कायम लाभ मिळावा.


मा. साहेब आपल्या मार्फत मुख्यमंत्री शासन प्रशासन यांना विनम्रपणे आव्हान करण्यात येत आहे की मराठा समाजाच्या संयमाचा अंत न पाहता लवकरात लवकर वरिष्ठ कालमर्यादा ठरवून ठराविक वेळेत या प्रकरणाचा सर्वोच्च अंतिम निकाल देण्यात यावा.
मा. साहेब मराठा समाजाच्या आरक्षणाला गंभीरपणाने घेऊन सदरील घटनापीठापुढे केंद्र सरकार राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाची बाजू भक्कम पणे मांडून समाजाला मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी निषतात व तज्ञ वकिलांची फौज उभा करावी त्यांच्या कामकाजावर दर आठवड्याला देखरेखीसाठी बैठक घेऊन कामावरून समाजापर्यंत माहिती द्यावी.
मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून तात्काळ निर्णय घेण्यात यावा. तसेच अध्यादेश किंवा पूर्ण विचार याचिका दाखल करून समाजाला आरक्षणाचा लाभ व हक्क मिळवून द्यावा व इतर राज्यांप्रमाणे याही प्रकरणात निर्णय व्हावा अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले.
यावेळी अंकुश कंटूले विजय कंटूले ज्ञानेश्वर उढाण आकाश आर्दड विकी शिंदे लखन लहाने शरद शिंदे गणेश काळे शरद आधुडे किशोर मोरे आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक