घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा गावात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

  घनसावंगी प्रतिनीधी/नितिन तौर घनसावंगी तालुक्यातील भेडाळा गावातील चार जणांचा अहवाल बुधवारी प्रयोगशाळाकडून आलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आला आहे तर बाचेगाव येथील एका जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर तालुक्यातील १८ जणांचा अहवाल निघेटिव्ह प्राप्त झाला आहे.
भेंडाळा गावातील एकाच कुटुंबातील ३७ वर्षीय पुरुष ,३२ वर्षीय महिला व १३ व १० वर्षीय मुलीचा समावेश आहे तर बाचेगाव येथिल एका 39 वर्षीय व्यक्तिचा समावेश आहे असे एकूण घनसावंगी तालुक्यात बुधवारी 5 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.तर आता ग्रामीण भागात हे प्रमाण अधिकच दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भितिचे वातावरण पसरले आहे. दरम्यान निघेटिव्ह आलेल्या अहवालात घनसावंगी ४,खापरदेव हिवरा १ , भेडाळा ५ , गुरुपिंप्री १ , माणेपूरी ५ ,सागर कारखाना २ गावाचा समावेश आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक