बिड जिल्हा

कोरोणाच्या भीतीने गेवराई उपजिल्हारुग्णालयातील डॉक्टर,आरोग्य कर्मचारी भयभित ..!

कोरोणा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकानी काळजी घेण्याची गरज

गेवराई प्रतिनिधी गोपाल भैय्या चव्हाण

उपजिल्हा रुग्णालयात कोविड 19 सेंटर सुरु केल्यापासून सामान्य रुग्णांची आवक थांबली
पण या रुग्णालयात काम करणारे काही डॉक्टर,आरोग्य कर्मचारी कोरोना पॉजिटिव आल्या पासून कोरोनाच्या भीतीने सर्वजन हादरले असून आपल्या घरातील लेकरांचे कसे होणार या चींतेने हैरान झाल्याचे दिसत आहेत

उपजिल्हा रुग्णालयात कोविड 19 सेंटर सुरु केले आहे या मध्ये आणि रुगनांच्या सेवेत बाह्यरुग्ण विभागात डॉक्टर,कर्मचारी रुगनसेवा करतात .अशीच रुगनसेवा करता करता काही नर्स कोरोना पोझिटिव्ह आल्या तेव्हा पासून रुग्णालयात काम करणारे डॉक्टर व कर्मचार्यात खळबळ उडाली आहे.
तसेच कोरोणा काळात उपजिल्हा रुग्णालयात कक्षसेवक पदासाठी अर्ज मागवले होते त्यात कक्षसेवक पद भरती केले परंतु ज्यानी नौकरी साठी अर्ज भरले तेच काम करण्यासाठी नकार देत आहेत त्यामुळे कक्षसेवक पदावर काम करणे मुश्किल झाले आहे

उपजिल्हा रुग्नाल्याच्या परिसरात ट्रामाकेअर मध्ये उभारलेल्या कोविड सेंटरच्या पाठीमागेच काही नर्स व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहेत,घरातील इतर कर्मचारी रुग्णसेवेसाठी रुग्णालयात जातात त्यानंतर त्यांची छोटी मोठी मूल मूली बाहेर प्रांगनात खेळतात ,कोरोना हा संसर्गजन्य रोग असून त्याच्या पासून आपल्या लेकरांची कशी सुरक्षा करायची हा मोठा प्रश्न संबधित रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यां समोर उभा राहिला आहे.

आधीच उपजिल्हा रुग्णालयात कोरोना झाला तर उपचारासाठी कोणतीच सुविधा नाही,आलेले वेंटिलेटर व इतर साहित्य तसेच बंदखोक्यात पडूंन आहे ,या रुग्नलयात कोरोना पॉजिटिव आलेल्या रुग्णांना आपल्या जीविताची हमी नाही त्यामुळे रुग्णालयात काम करणारे डॉक्टर,कर्मचारी कोरोनाच्या भीतीने हादरले असून भयभीत झाले आहेत,त्यांची व नागरिकांची ही भीती दूर करण्यासाठी कोरोना सेंटर तिथुन हलवून इतर ठिकाणी सुरु करावे ,आलेले वेंटिलेटर स्वतंत्र आय सी यु ऑक्सीजन साहित् सुरु करावे तरच ही भीती दूर होईल नसता भीतीनेच लोक मरतील म्हणून जिल्हाधिकारी व इतर लोकप्रतिनिधी यांनी जातीने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक