Breaking News
परतूर तालुका

अहो 25 वर्ष काम केले आतातरी सेवेत घ्या ,परतूर नगर पालिकेसमोर आमरण उपोषण

टेंडर प्रक्रिया रद्द करा सफाई कामगारांचे परतुर नगर पालिकेसमोर अमरण उपोषण

EPF ची रक्कम नगर परीषदेने हडप केली ?

दिपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क दि १२
नगर पालिका परतूर अंतर्गत गेल्या पंचवीस(25) वर्षापासून रोजंदारीवर कार्यरत असणा-या कामगारा विषयी जी टेंडर प्रक्रिया राबवली आहे ती टेंडर प्रक्रिया रद्द करा व कार्यरत रोजंदारी कामगार हे उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट पिटीशन क्र.13825/18 हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना कार्यरत रोजंदारी कामगारांना सेवेत सामावून घेण्याचे प्रकरण अंतिम टप्प्यात असून सदरचे नगर पालीकेने दि. 1/8/ 2020 रोजी कार्यरत रोजंदारी कामगार विषयी काढण्यात आलेले टेन्डर तात्काळ रद्द करुन सफाई कामगारांना तात्काळ कायम स्बरूपी सेवेत घेण्या बाबतचे निवेदन देऊन परतुर नगर पालिकेतील रोजंदारीवर असलेल्या कामगारांनी नगर पालिकेचे समोर उपोषणआज पासून उपोषण सुरु केले आहे.


दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की कामगार हे गेल्या पंचवीस (25) वर्षापासून परतूर नगर पालिकेत स्वच्छता विभाग व पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहेत तसेच महाराष्ट्र शासनाची दि.5 /2 /2019 रोजी राज्यातील 11/3/ 1993 ते 27 / 3 /2000 पर्यंत कालावधीतील रोजंदारी कामगारांना सेवेत सामावून घेण्यासाठी 1416 जागा भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. परतूर नगर पालिकेतील सर्व रोजंदारी कामगारांचे यादी शासनाने प्रसिद्ध केलेली सुध्दा आहे .शिवाय शासनाने संदर्भ क्रमांक 3 नुसार परतूर नगर पालिकेला 6 /3 /2020 रोजी पत्र पाठवून माहिती मागितलेली आहे. परंतु परतूर नगर पालिकेने अद्याप पर्यंत माहिती दिलेली नाही. कारण त्यांना कार्यरत रोजंदारी कामगार विषयी टेंडर प्रक्रिया राबवणे सोयीचे होईल या कारणास्तव सदरची महत्त्वाची माहिती देण्यात आली नाही . जर माहिती देण्यात आली असती तर कामगारांचे समावेशन कोणत्या ना कोणत्या नगर पालिकेत झाले असते परंतु जाणून-बुजून हेतुपूर्वक सदरची माहिती देण्यात आलेली नाही.असाही अरोप निवेदनात करण्यात आलेला आहे.

परतूर नगरपालिका कामगारांची सेवा सातत्य संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत असून परतूर नगर पालिके मार्फत जुलै 2011 पासून ते आजपावेतो कामगारांची EPF कपात करण्यात आलेली आहे. परंतु परतूर नगर पालिकेने भ्रष्टाचार करत EPF ची रक्कम भरणा केलेली नाही यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी असेही निवेदनात नमूद आहे परतुर नगर पालिका राजकीय दबावा पोटी काम करीत आहे .

असेही दिलेल्या निवेदनात आहे. दिलेल्या निवेदनावर परतुर नगर पालिकेतील रोजंदारीवर असलेल्या कामगार सुनिल जाधव ,राजु कसबे, दिपक मोरे, दौलत काळे, रामा काळे ,अशोक धोत्रे ,काशिनाथ हिवाळे, कैलास हिवाळे, मोहन हिवाळे, प्रकाश हिवाळे, शाम हिवाळे, मरीबा उफाडे ,रामदास प्रधान, हरीभाउ हिवाळे ,कचरु थोरात, शेषराव चव्हान, नामदेव चव्हान, गरीब्या काळे, अशोक हिवाळे, लक्षमण हिवाळे, दशरथ हिवाळे, लक्षमण पाडेवार, बाळु पाडेवार ,गंगाधर पाडेवार, रमेश चंदालिया , आशोक ढोले, नजिर काजी, जावेद शेख ,अशोक काबरे, बाबासाहेब चव्हान, अन्वर शेख, मथाबाई पाटोळे, संजवनी हिवाळे , मंगलबाई डव्हारे, सुशिलाबाई हिवाळे, कोंडाबाई शेषकला हिवाळे ,अशाबाई वाघमारे ,यमुनाबाई गोटे , येणुबाई रणपिसे , शांताबाई हिवाळे ,द्वारकाबाई हिवाळे, बालाजी पवार, सुनिल जाधव, विजय कांबळे, अर्जुन हिवाळे, सुनिल मथुरे ,रामेश्वर अंभुरे , यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक