भोकरदन तालुका

बालिकेवरील उपचारास नकार देणाऱ्या डॉक्टरावर कारवाई करा

आजोबाची ग्रामपंचायत कडे तक्रार

पिंपळगाव रेणुकाई /गणेशराव खिस्ते दि १२

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे अडीच महिन्यांच्या बालिकेला उपचारासाठी घेऊन गेलेल्या आजोबांना तुम्हाला कोरोना झाल्याचे सांगत तिच्यावर उपचार न करता एका खासगी डॉक्टराने वापस पाठवल्याची घटना घडली . दरम्यान या प्रकरणी मुलीचे आजोबा प्रभाकर देशमुख यांनी ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टराविरोधात तक्रार केली आहे .

पिंपळगाव रेणुकाई येथे तीन दिवसांत सहा कोरोनाचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राम पंचायतीसह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावात घरोघरी जाऊन सर्वे करणे सुरू आहे . बालिका आजारी पडल्याने सोमवारी तिच्या आजोबांनी गावातील खासगी दवाखान्यात तपासणीसाठी नेले . यावेळी डॉक्टरांनी तुम्हाला कोरोना झाला असल्याचे सांगत तपासणी न करता परत पाठवले.याप्रश्नी बालिकेच्या आजोबाने डॉक्टराविरुध्द तक्रार दिली आहे.

आमच्याकडे डॉक्टर बद्दल तक्रार प्राप्त झाली असून संबंधित डॉक्टरची चौकशी करून त्या डॉक्टरांविरोधात नोटिस देऊन कारवाई करण्यात येईल . – पि.जी.सुरडकर , ग्रामविकास अधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक