बदनापूर तालुका

बदनापूर वंचित बहुजन आघाडीच्या विविध मागण्यांसाठी वतीने डफली बजाओ आंदोलन

बदनापूर तहसीलदार यांना निवेदन सादर

बदनापूर /किशोर सिरसाठ : बदनापूर प्रतिनिधी किशोर सिरसाठ बदनापूर येथील बस स्थानक वर डफडी बजाओ आंदोल करण्यात आले असून विविध मागण्या सहित तहसीलदार छाया पवार यांना निवेदन सादर करण्यात आले.


25 मार्च पासून कोरोना फैलाव रोखण्यासाठी देशभर उपाय करण्यात आले सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली, ऑफिस, दुकाने, हॉटेल,जिम,सिनेमाग्रह, मंदिर, मार्केट,इत्यादी ज्यामुळे लोकातील संपर्क कमी होऊन अशाप्रकारे सर्व निर्बंध लावण्यात आले होते या चार महिन्यात कोरोणाचा प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर कोरोनाचा प्रसार लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेमुळे सुधारणा करण्याची आवश्यकता आहे गरीब हातावर पोट असलेल्या बहुसंख्य लोकांचे रोजगारांवर उपासमारीची वेळ येत आहे अनेक व्यवसाय तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे कोरोना विरुद्ध लढण्याची प्रतिकार क्षमता अंदाजे 80 टक्के लोकांमध्ये आहे म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी जो काही निर्बंध लावण्यात आले आहे ते आवश्यक के लावावे परंतु आज जनजीवन विस्कळीत होत आहे अशा परिस्थितीत आर्थिक चक्र चालणे गरजेचे आहे


आज देश महाराष्ट्र हे आर्थिक संकटाच्या खाईत पडले आहे म्हणूनच शासनाने यावरती तात्काळ विचार विनिमय करून जो काही जाचक निर्बंध लादण्यात आले ते तत्काळ माघे घेऊन व्यवसायिकांना तसेच जिल्हाबंदी उठून सर्व सुरळीत चालेल अशी उपाययोजना करावी त्याच पद्धतीने एस टी महामंडळ बसेस ते तत्काळ सुरू करावे आज खाजगी वाहनांकडून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेची लूट होत आहे म्हणूनच लालपरी ही तत्काळ सुरू करावी जेणेकरून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार नाही दळणवळणाचा अभाव निर्माण होत आहे तो तात्काळ शासनाने निर्णय घेऊन योग्य तो एसटी महामंडळाच्या बसेस चालू कराव्या अशी बहुजन वंचित आघाडी च्या वतीने बदनापूर बस स्थानक येथे डफली बजाओ आंदोलन करण्यात आले तसेच तहसीलदार यांना निवेदन सादर केले यावेळी
.यावेळी निवेदन देताना प्रकाश मगरे,संतोष शेळके,रविराज वाहूळे,हरीश बोरुडे,विनोद मगरे,राहुल चाबुकस्वार,सुमित जगताप,परमेश्वर हिवराळे,संदीप साबळे,राहुल तुपे, राहुल पटेकर, ,किशोर बोर्डे, राहुल सुर्यवंशी, अजय साबळे,प्रदीप पटेकर, सचिन साबळे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक