भोकरदन तालुका

पिंपळगाव ते पारध रस्त्यावर पडले खड्डे ;त्यात पाणी तुंबल्याने अपघात होण्याची शक्यता

सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी

पिंपळगाव रेणुकाई /

भोकरदन तालुक्यातील
पिंपळगाव ते पारध या पाच किलोमीटर रस्त्याची सध्या चांगलीच दुर्दशा झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहे. पाऊस पडला की ते वरचे पाणी त्यात तुंबते त्यामुळे वाहनचालकाचा वाहन चालवितांना अंदाज चुकतो परिणामी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येजा करणार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता विदर्भ व मराठवाड्यातील सिमेवर येत असल्याने पिंपळगाव सह परिसरातील पारध धामणगाव डोमरुळ धाड मासरुळ तराडखेड गुम्मी मढ या गावातील नागरिक व शेतमजूर सतत येजा करतात. तसेच या मार्गावर चार चाकी तीन चाकी दुचाकी वाहनाची नेहमीच वर्दळ असते .

काही महीण्यापुर्वी या रस्त्याच्या कामाला सुरवात ही झाली होती.त्यानंतर मात्र कोठे माशी शिंकली हे कळायला मार्ग नाही. सध्यास्तीथीत या रस्त्याच्ये काम बंद असल्यामुळे प्रवाशी या रस्त्यानी वापरतांना पुरते हैराण झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावरील तात्पुरते खड्डे भरण्यात आले होते‌. परंतू आता परत पावसाळ्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडल्याने रहदारीला मोठा अडसर निर्माण होत आहे. संबधीत कंत्राटदाराने पाच महिन्यांपूर्वी रस्त्याचे डागडुगीचे काम केले होते.ते काम निष्कृृृष्ट केल्याचा आरोप नागरिक व वाहनधारकामधुन होत आहे.

संबंधित ठेकेदाराने हा रस्ता पुर्णपणे ऊखडुन ठेवल्याने रस्त्यावर जागोजागी जिवघेणे खड्डे पडले आहे.यास संबंधित कंत्राटदार जबाबदर असल्याचे वाहनधारक व नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ताक्ताळ हा रस्ता वाहतुकीसाठी तयार करण्यात यावा अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. संबधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक