Breaking News
जालना जिल्हा

जालना जिल्हात बुधवारी एकूण कोरोना बाधीतचा आकडा झाला तीन हजार पार

  न्यूज जालना ब्युरो दि१२ जालना जिल्ह्यात बुधवारी १०९ रुग्णांची भर पडली आहे यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णांची संख्या ३१२३ वर पोहचली आहे तर तीन कोरोना बधितांचा मृत्यु झाला असून एकूण बळीची संख्या १०४ वर गेली आहे तर जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही १११० तर १९०९ रुग्णांवर उपचार करून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी न्यूज जालना ला दिली आहे. जिल्ह्यात खालील भागातील रूग्ण आढळले पॉझिटिव्ह जालना शहरातील निर्मलनगर ०१ , टाऊन हॉल ०१ , भवानीनगर ०१ , गुडला गल्ली ०१ , समर्थनगर ०१ , नुतन वसाहत ० ९ , वल्ली मामु दर्गा मंगळबाजार ०३ , गंगा बिल्डींग दुर्गामाता रोड ०७ , शांकुतल नगर ०१ , आनंदवाडी ०३ , निओन चौक ०३ , योगेश नगर ०८ , घनसावंगी ०३ , भोगाव ०२ , तिर्थपुरी ०३ , कंडारी ०४ , देवी दहेगाव ०१ , कुंभार पिंपळगाव ०३ , मुरमा ०४ , काझी गल्ली परतुर ०४ , मोंढा परतुर ०१ , आष्टी ता परतुर ०२ , रोहीणा खु ०२ , रामेश्वर गल्ली ०१ , देशमुख गल्ली भोकरदन १० , अक्षयनगर परतुर ०१ , सुगंधानगर मंठा ०३ , पाटोदा ता मंठा ०१ , तळणी ता मंठा ०१ , पारध बु ०२ , वालसावंगी ०१ , धोत्रा ०१ , कंडारी ०१ एकुण ९ ० व्यक्तीच्या स्वबचा व अँटीजेन तपासणीद्वारे १ ९ व्यक्तींचा अशा एकुण १०९ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली . जिल्ह्यातील ह्या भागातील एकूण ३८ रुग्णास उपचार करून केले डिस्चार्ज बुधवारी जालना शहरातील लोधी मोहल्ला ०१ , जयभवानी नगर ०१ , मध्यवर्ती कारागृह जालना ०१ , लक्ष्मीनारायणपुरा ०१ , पानीवेस ०२ , बिहारीलालनगर ०१ , डबलजीन ०२ , हनुमान घाट ०१ , यशवंत नगर ०१ , शंकरनगर ०३ , साईनगर ०१ , मिशन हॉस्पिटल परिसर ०१ , विद्यानगर ०१ , शनिमंदिर परतुर ०१ , वाणढोक ०१ , सिंदखेडराजा ०१ , देऊळगाव राजा ०३ , म्हसला ०१ , भोकरदन १४ एकूण ३८ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली . 3 कोरोना बधितांचा मृत्यू :- जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार रोजी ०३ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे . सदरील रुग्ण जालना शहरातील सिंधी बाजार परिसरातील ५५ वर्षीय पुरुष , लक्ष्मीनारायणपुरा परिसरातील ८० वर्षीय महिला व मंमादेवी परिसरातील ८० वर्षीय महिला अशा तीन रुग्णांचा समावेश आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक