भोकरदन तालुका

माझ कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत तेरा गावात मोहीम राबवणार”डाॅ.वसीम पठाण

जळगाव सपकाळ (ता भोकरदन ):—भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ प्राथमिक अारोग्य केंद्रा अंतर्गत येणार्‍या तेरा गावामध्ये कोरोना रोगाच्या नियंञणासाठी “माझ कुटुंब माझी जबाबदारी या मोहीम अंतर्गत अारोग्य केंद्राच्या जळगाव सपकाळ,हिसोडा,कोठा कोळी,करजगांव,कल्याणी,सुरंगळी,दानापुर,भायडी,दगडवाडी,वडशेद,तळणी,मुर्तड या गावातील तीस हजार लोकसंख्या असलेल्या नागरिकाची प्रत्येकांच्या घरी जाऊन अारोग्य केंद्रातील पथकाव्दारे सर्वेक्षण करण्यात येणार अाहे तसेच त्यांची अारोग्य तपासणी करुन काहीना सर्दि,ताप,खोकला,बि.पी,शुगर,कॅन्सर,या सारखे अाजार अाढळल्यास दवाखान्यात उपचार करण्यात येणार तर कोरोनाची तपासणी सुध्दा करण्यात येणार असुन दोन टप्यामध्ये ही मोहीम या गावामध्ये राबवण्यात येणार असुन या मोहीमेचे सुरुवात मंगळवारी करण्यात अाली

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनिता शिवाजी सपकाळ,सरपंच शामकांत सपकाळ,वैघकीय अधिकारी डाॅ.वसीम पठाण,शिवाजी सपकाळ यासह अारोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी तसेच अाशा सेविका केद्राच्या अारोग्य सेविका यांची उपस्थीती होती.
फोटो अाहे.”माझ कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेचा शुभारंभ करताना जि.प.सदस्या सुनिता सपकाळ,सरपंच शामकांत सपकाळ,डाॅ.वसीम पठाण व अारोग्य विभागाचे कर्मचारी .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक