जालना जिल्हा

वंचित शेतकऱ्यांनी माहिती अपडेट करावी -विष्णू पाचफुले

नाव्हा -वरूड सोसायटीच्या लाभार्थ्यांना पिककर्जाचे धनादेश वितरित
जालना न्यूज ब्युरो दि १६ : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या म. ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळाला असून तांत्रिक अडचणींमुळे वंचित राहिलेल्या पाञ शेतकऱ्यांनी माहिती अपडेट करावी. असे आवाहन नाव्हा- वरूड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन विष्णू पाचफुले यांनी केले.

नाव्हा – वरूड विविध विकास सेवा सहकारी संस्थेच्या पाञ लाभार्थी शेतकऱ्यांना पिक कर्जाचे धनादेश बुधवारी ( ता. १६) संस्थेचे चेअरमन विष्णू पाचफुले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.या वेळी सचिव दासखेडकर, भाग चौकसणीस प्रमुख एस. यु. गोडबोले, संचालक विष्णू भुतेकर, उध्दव भुतेकर, गणेश भुतेकर, भगवान सुरूशे यांची उपस्थिती होती.

विष्णू पाचफुले पुढे म्हणाले की, कर्जमुक्ती योजनेत सोसायटी चे तुरळक सभासद व संचालक सोडले तर ९५ टक्के शेतकरी पाञ झाले आहेत. तथापि वंचित शेतकऱ्यांनी थंब देऊन लाभ घ्यावा. असे सांगून पाञ शंभर शेतकऱ्यांना पिककर्जाचे धनादेश वितरित केले असून उर्वरित रक्कम येताच तातडीने वितरण केले जाईल असे विष्णू पाचफुले यांनी सांगितले.
सुञसंचालन व आभार प्रदर्शन शाखाधिकारी आर. आर. सोळंके यांनी केले.


या वेळी संचालक सर्व श्री रामू भुतेकर, सत्यभामा भुतेकर, सिध्दुआप्पा झारकंडे, बबन म्हस्के, शेख शब्बीर, विमल म्हस्के, वाघू राठोड, अमोल सरकटे, यांच्या सह विठ्ठल राठोड, सुभाष कुहिरे, मुकुंद बाळराज, मारोतराव भुतेकर, कारभारी भुतेकर, पुंजाराम भुतेकर, रामेश्वर भुतेकर, एकनाथ भुतेकर व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक