Breaking News
परतूर तालुका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस सेवा सप्ताह विविध उपक्रमाद्वारे साजरा


दिपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त
माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ. अजीत गोपछडे, भाजयूमो प्रदेश सरचिटणीस राहूल लोणीकर व भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश समन्वयक डॉ स्वप्नील बी. मंत्री यांच्या पुढाकाराने भाजपा वैद्यकीय आघाडीच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून रूग्णांची तपासणी थर्मल स्क्रिनींग करून त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत औषधी, फेस मास्क, फळे, सँनिटायजरचे वाटप करून कोरोना आजारा विषयीचे मार्गदर्शन करण्यात आले. यात कुपोषण मुक्त, ड्रग मुक्त व प्लास्टिक मुक्त भारताचा संकल्प घेण्यात आला व कुपोषित बालकांची सेवा सप्ताह अंतर्गत मंत्री बाल रूग्णालय येथे मोफत तपासणी करण्यात आल्याचे सांगून डॉ. मंत्री यांनी भाजपा वैद्यकीय आघाडीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी भाजपा तालूका अध्यक्ष रमेश भापकर, दैठण्याचे सरपंच शत्रूघ्न कणसे, डॉ. राजेंद्र काबरा, डॉ. बी. आर. मंत्री,व फार्मासिस्ट व्यवसायिक अमोल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबीराच्या यशस्वितेसाठी नर्सिंग स्टाफ सुवर्णा साठे, शिवाजी पवार व मनिषा जगताप आदींनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक