जालना जिल्हा

मोहोरात हुतात्मा स्मारकाची दुरव्यवस्था,अनेक ठिकाणी गेले तडे

मराठवाडा मुक्ति संग्राम दिन विशेष माहोरा : रामेश्वर शेळके जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा व वरुड येथील हुतात्मा स्मारक हे घाणीच्या विळख्यात आहे . वरुड येथील हुतात्मा स्मारकाला मोठमोठाले तडे गेल्याने हुतात्मारकाची दुर आवस्था झाली आहे या स्तंभाजवळ दुर्गंधी पसरली दिसुन आली आहे तर माहोरा स्तंभाजवळ हॉटेलचे घाण पाणी जात असुन त्या ठिकाणी चहुबाजुनी अतिक्रमणाणी वेढलेले आहे हॉटेल चालक त्या ठिकाणी चहाचे ग्लास व घाण फेकत असल्याने दयनीय अवस्था येथील हुतात्म स्मारकाची झाली आहे . सविस्तर वृत्त असे की , मराठवाडा निजाम राजवटीतुन मुक्त होण्यासाठी अनेक हुतात्माचे बलीदान गमवावे लागले त्यातचे माहोरा व वरुड येथील काही हुतात्म्यांचे श्रेय असल्यामुळे पुढील पिढीसाठी कायम आठवण राहण्यासाठी स्तंभ उभारण्यात आले आहे परंतू या ठिकाणच स्तंभ पुर्णत अतिक्रमणाने धारकाने नजरेआड केले आहे .विशेष बाब म्हणजे हुतात्मा स्तंभाजवळ अतिक्रमणामुळे दुरव्यवस्था झाली आहे या बाबीकडे संबधीत प्रशासन व ग्रामपंचायतचा कारभार पुन्हा चाव्हाट्यावर आला आहे . आशा या महान हुताम्यांनी मराठवाडा मुक्तीसाठी आपले बलीदान दिले गेले असल्यामुळे पुढील आठवणीसाठी कायम रहावे या साठी हे स्तंभ घाणीच्या विळख्यातुन मुक्त करण्याची गरज आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक