Breaking News
अंबड तालुका

श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूल येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

अनिल भालेकर/अंबड

अंबड दिनांक 17 सप्टेंबर श्रीमती. चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूल येथे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळून व शासकीय नियमांचे पालन करून मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा करण्यात आला .सुरुवातीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.सुरेश दिडपोळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. स्वागत गीतानंतर शाळेतील शिक्षकांची समयोचित भाषणे झाली .या कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार कासलीवाल, जीवराज बुरले डॉ.रमेश गंगवाल शिरिष सावजी, प्रवीण बाकलीवाल, संजय चांदीवाल ,राजेंद्र काला ,सुरेश दिडपोळे, डॉ. नरेश अग्रवाल, डॉ. संतोष मोहळे, चंद्रप्रभू दीडपोळे, संजय इंचूरे, मुकेश सावजी, संतोष बाकलीवाल, दीपक पाटणी, भूषण काला ,डॉ. अनिल पांडे व शाळेचे मुख्याध्यापक एन एस भारद्वाज व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती शेवटी वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक