Breaking News
बदनापूर तालुका

मोकाट जनावाराच्या टोळक्यामुळे पाडळी गावातील शेतकरी त्रस्त…

मोठया प्रमाणात पिकांची नासाडी तर शेतकऱ्यांची बंदोबस्त करण्याची मागणी…!

बदनापूर / किशोर शिरसाठ दि १७

बदनापूर : पाडळी गावात मोकाट जनावराचे टोळक ठरल शेतकऱ्यांची डोकेदुखी गाव लगत असलेले शेतातील पिकांची अक्षरशः या मोकाट जांनावरने नासाडी करत आहे.
आधीच अतिउर्ष्टी झाल्याने पिकांची अतोनात नुकसान झाले आणि त्यात उरले सुरले पीक या मोकाट जनावरांचा त्रास उगाच सहन करावा लागत आहे. हाता तोंडाशी आलेले शेतकऱयांचे पीकावर आता मोकाट जनावरांचा जोरदार ताव सुरू असल्याने शेतकऱ्यांना खडा पहारा द्यावा लागत आहे. या शेतातून त्या शेतात मोकाट टोळक फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आपसात संभ्रम निर्माण होऊन एकमेका विरुद्ध वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ते वेळेस थांबले गेल पाहिजे त्या साठी मोकाट जनावरांचे टोळक्याच बंदोबस्त होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतने या बद्दलचे महत्वाचे पाऊल उचलाव वेळेस बंदोबस्त करावा अशी शेतकऱयांची मागणी आहे.

मोकाट जनावरांचे बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत तयार आहे.परंतु गावकऱ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. तरच शक्य आहे या पूर्वी ग्रामपंचायतने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु काही लोकाचा विरोध असल्याने बंदोबस्त करण्यास अयशस्वी ठरलो होतो. शेतकऱ्यांच पिकाच नुकसान होत असेल तर नक्कीच ग्रामपंचायत कडूनसहकार्य मिळेल त्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्यची गरज आहे.

अविनाश शेळके पाडळी सरपंच

तालुका कृषी अधिकारी ए.एम .ठक्के

मोकाट जनावरांना ग्रामपंचायतमार्फत  कोडवाडात टाकावे. किंवा दूर तलावाच्या ठिकाणी पाठवावे अन्यथा गोशाळेत हे प्रकरण गावपातळीवर सोडण्यात यावा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक