बदनापूर तालुका

भा.ज.पा च्या अपंग आघाडीचे संयोजक पदी विशाल जारवाल

किशोर सिरसाट/बदनापूर

तालुक्यातील सागरवाडी येथील विशाल जारवाल यांची बदनापूर तालुका अपंग आघाडीचे संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे

ही नियुक्ती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, जालना जिल्हाअध्यक्ष आ. संतोष पाटील दानवे, बदनापूर आ. नारायण कुचे. भाजपा तालुकाध्यक्ष भिमराव भुजंग यांनी ही नियुक्ती केली आहे. विशाल जारवाल हे गेल्या अनेक वर्षांपासून भा. ज. पा पार्टी मध्ये काम करत आहे तसेच ते सामाजिक कार्यामध्ये ही अग्रेसर आहे. त्यांचे कामे व सामाजिक कार्य पाहून तालुक्यातील अपंग व निराधार नागरिकांचे समस्या सोडविण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी व पक्ष वाढीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे असे मा. आमदार. नारायण कुचे यांनी सांगितले.. या वेळी. जिल्हा अध्यक्ष आ संतोष दानवे,आ. नारायण कुचे,महाराष्ट्र कार्यकारणी सद्स्य बद्रिभाऊ पठाडे, बदनापूर यू. मो. अध्यक्ष गणेश कोल्हे,भा ज पा ,बदनापूर तालुका अध्यक्ष भिमराव भुजंग,महामंत्री भगवान मात्रे. सागरवाडी येथील अंबरसिंग बहूरे, प्रताप बहुरे,अजित खोकड, दारासिंग खोकड आदींनी त्यांचे स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक