Breaking News
जालना जिल्हा

जालना पोलिसांनी गुन्हे दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याने प्रशस्तीपत्र देऊन गौरव

जालना जिल्हयातील दाखल असलेल्या खटल्याची पोलीस ठाणे निहाय गुन्हे दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याने प्रशस्तीपत्र देऊन गौरव न्यूज जालना ब्युरो दि १७ :- जालना जिल्हयातील पोलीस ठाणे निहाय मा.न्यायालयात दाखल प्रकरणात गुन्हे दोषसिध्दी च्या अनुषगाने माहे ऑगस्ट 2020 मधील मा.न्यायालयातील निकाली लागलेल्या खटल्याची जिल्हयातील पोलीस टाणे निहाय गुन्हे दोषसिध्दीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे . पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासीक अधिकारी गुन्हयाचा तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करतात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर सुनावणी दरम्यान आरोपींना शिक्षा होण्यासाटी सदर प्रकरणात पाठपुरावा करणे आवश्यक असते . या सर्व प्रकरणात पाठपुरावा करण्या करीता व मा.न्यायालयात साक्षीपुराव्या दरम्यान तपासिक अधिकारी व सरकारी वकीलांना मदत करण्यासाटी कोर्ट पैरवी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणुक केली जाते . या सर्व कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी चांगली कामगीरी केल्यामुळे दोषसिध्दी मध्ये वाढ झालेली आहे . त्या अनुषगाने 17 सप्टेबर 2020 रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमीत्त पोलीस अधीक्षक कार्यालय , जालना येथे आयोजित कार्यक्रमात पुढील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना न्यायालयात दाखल असलेल्या खटल्याची गुन्हे दोषसिध्दी वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याने मा.पोलीस अधीक्षक श्री.चैतन्य यांनी पोलीस ठाणे अधिकारी , कोर्ट पैरवी व दोषासिध्दी शाखेतील अधिकारी 1 ) श्री.राजेंद्रसिंह गौर , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , जालना ( कोर्ट पैरवी व दोषासिध्दी शाखा पोलीस अधिकारी ) 2 ) श्री.अनिरुध्द नांदेडकर , पोलीस निरीक्षक , पोलीस ठाणे अंबड , 3 ) श्री.संजय देशमुख , पोलीस निरीक्षक , पोलीस ठाणे सदर बाजार जालना 4 ) श्री.मारोती खेडकर , पोलीस निरीक्षक , पोलीस ठाणे वदनापुर 5 ) श्री.रमेश जोगदंड , पोलीस हवालदार , नेम.पोलीस मुख्यालय , जालना , 6 ) श्री.दुर्गादास कौशल्ये , पोलीस हवालदार , नेम.पोलीस मुख्यालय , जालना 7 ) श्री.एम.एच.सोनटके , पोलीस हवालदार , नेम . पोलीस ठाणे सदर बाजार , जालना 8 ) श्री.एम.ए.काळे , पोलीस हवालदार नेम.पोलीस ठाणे बदनापुर , 9 ) श्री.जावेद शेख , पोलीस नाईक , नेम.स्थानिक गुन्हे शाखा , जालना ( कोट पैरवी ) 10 ) श्री.खलील वेग , पोलीस शिपाई , नेम.स्थानिक गुन्हे शाखा , जालना , ( कोट पैरवी ) 11 ) श्री.राहुल कटकम , पोलीस शिपाई , नेम.पोलीस मुख्यालय , जालना ( कोर्ट पैरवी ) 12 ) श्री.एच.टी.क्षीरसागर , पोलीस शिपाई , नेम.दोषसिध्दी शाखा , जालना ( दोषसिध्दी ) 13 ) श्रीमती सी.एस.म्हस्के , पोलीस हवालदार , पोलीस ठाणे अंबड , ( कोर्ट पैरवी ) 14 ) श्रीमती उषा आवचार , पोलीस नाईक , नेम.पोलीस मुख्यालय , जालना ( कोर्ट पैरवी ) 15 ) श्रीमती सारिका गोडबोले , पोलीस नाईक , नम.स्थानिक गुन्हे शाखा , जालना ( दोपसिध्दी ) 16 ) श्रीमती सिमा जाधवर , पोलीस नाईक , पोलीस ठाणे सदर बाजार जालना ( कोर्ट पैरवी ) 17 ) श्रीमती सिमा महाजन , महिला शिपाई , म.स्थानिक गुन्हे शाखा , जालना , ( कोर्ट पैरवी ) 18 ) ज्योती गाडेकर , पोलीस शिपाई , नेम.पोलीस मुख्यालय , जालना ( दोषसिध्दी ) यांना बक्षीसपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरवविण्यात आलेले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक