कोरोना पॉझिटिव्ह बातमीजालना जिल्हा

जालना जिल्ह्याची कोरोना पॉझिटिव्ह संख्या ७ हजार पार – आज ९७ रुग्णांची भर

  न्यूज जालना ब्युरो दि १७ –

जालनातील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण मागील दोन ते तीन दिवसांपासून वाढ झालेली असून यात गुरुवारी सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे तर ९७ नवीन रुग्णांची भर ही पडली आहे दरम्यान कोरोना बळी ची संख्या ही १८३ वर पोहचली आहे तर एकूण पॉझिटिव्ह संख्या आता ७०४३ झाली आहे तर सक्रिय संख्या ही १४७३ झाली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार ०६ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण जालना शहरातील तटदुपुरा परिसरातील ५५ वर्षीय पुरुष , जालना शहरातील प्रयाग नगर परिसरातील ७० वर्षीय महिला , वाघाळा ता सिंदखेडराजा येथील ७४ वर्षीय पुरुष , केनवड जि वाशीम येथील ७० वर्षीय महिला , दरेगाव ता जालना येथील ६५ वर्षीय पुरुष जानेफळ ता भोकरदन येथील ६५ वर्षीय पुरुष आहे .याचा समावेश आहे

जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार डेडीकेटेडकोवीड हॉस्पिटल , डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर , कोवीड केअर सेंटरमधील १०० रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे .

 जालना तालुका- राजपुतबाडी ०२ , गांधीचमन ०१ , एस आर पी एफ निवासस्थान ०१ , प्रियदर्शनी कॉलनी ०१ , देवपुर ०१ , भाटेपुरी ०१ , हिवर्डी ०१ ,

मंठा तालुका- वाघाळा ०१ , परतूर_०० ,

घनसावंगी तालुका- भेंडाळा ०४ , बाचेगाव ०१ , अंबड तालुका- महेबुब नगर ०१ , गणपती गल्ली ०१ , म्हाडा कॉलनी ०१ , सोनक पिंपळगाव ०१ , माथ तांडा ०१ , दाढेगाव ०१ ,

बदनापूर तालुका बदनापूर शहर ०१ , खापरखेडा ०२ , धाकरवाडी ०१.जाफ्राबाद तालुका -आदर्श नगर ०४ , खासगाव ०१ , जानेफळ पंडीत ०१ , हनुमंतखेडा ०२.

भोकरदन तालुका – भोकरदन पिंपळगाव रेणुकाई ०२ , सुभानपुर ०१ , पिंपळगाव ०१ , जळगाव सपकाळ ०२ , वालसा डावरगाव ०३ , .

इतर जिल्हा- मेहकर ०४ , मेहरा खु ता चिखली ०१ , काकडा जि बुलढाणा ०१ , सिंदखेडराजा ०२ , देऊळगाव राजा ०१ , मेव्हणाराजा ०१ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ५१ व्यक्तीचा व अँटीजेनतपासणीद्वारे ४६ व्यक्तींचा अशा एकुण ९ ७ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक