भोकरदन तालुका

करजगांव येथे विविध कृषिविषयक उपक्रमांचे आयोजन

मधुकर सहाने : भोकरदन

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय कराड यांच्यावतीने करजगांव येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि ओद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जुलै पासून विविध कृषी विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांतर्गत कृषिदुत केतन कडूबा बोरसे यांनी गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती करत असतांना मातीचे नमुने कसे घ्यावेत, शेती मध्ये इंटरनेट व मोबाईल अॅप्स चा वापर, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, आधुनिक पशुपालन व इतर विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी संतोष विनायकराव बोरसे, कडुबा बोरसे, गणेश गावंडे, बेबीताई बोरसे, अनिता बोरसे, विमलबाई गावंडे व इतर शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. आर. सूर्यवंशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. एस. नावडकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एस कोळपे यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक