जालना जिल्हा

जालन्याचे नवीन एस.पी विनायक देशमुख

न्यूज जालना ब्युरो दि १८ – जालना जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विनायक देशमुख हे नवे पोलीस अधिक्षक म्हणून रुजु होणार आहेत. परंतु जालन्याचे पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांच्यासह काही अधिकार्‍यांना अजुन पदस्थापना देण्यात आलेली नाही. त्यांच्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश निर्गमीत करण्यात येणार आहेत. जालना जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांची दि. 17 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने जारी केलेल्या आदेशान्वे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विनायक देशमुख हे रुजु होणार आहेत. विनायक देशमुख हे आतापर्यंत मुंबई येथील कायदा व सुव्यवस्था महासंचालक कार्यालयात ते सहाय्यक पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. दि. 17 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार राज्यातील सुमारे 22 पोलीस अधिक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. विनायक देशमुख हे जालन्याचे नवे पोलीस अधिक्षक म्हणून रुजु होणार असले तरी जालन्याचे सध्याचे पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांना मात्र पदस्थापना देण्यात आली नाही. त्यांच्यासह अन्य 13 अधिकार्‍यांच्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश निर्गमीत करण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक