औरंगाबादजालना जिल्हा

गोदावरी नदीला पुर ,प्रशासनाकडून गोदाकाठच्या गावांना हाय अलर्ट

न्यूज जालना ब्युरो दि १८ जायकवाडी धरण (दि १७ सप्टेंबर)गुरुवारी रात्री पर्यत ९९ टक्के च्या वर भरल्याने जायकवाडी प्रशासनने ९४३२० क्यूसेक चा विसर्ग गोदावरी नदीपात्रा मध्ये प्रवाहीत करण्यात आला असल्याने नदीला पूर आला आहे सदर्भित पाणी शुक्रवारी सकाळपर्यत घनसावंगी तालुक्यात पोहचले असून जायकवाडी चे सर्व दरवाजे उगडणे व आपत्कालीन दरवाजे उगडण्याचे जायकवाडी च्या इतिहासात दुसऱ्यादा घडले आहे.   कार्यकारी अभियंता, जायकवाडी प्रकल्प, पैठण यांचे मार्फत दि १७/०९/२०२० रोजी रात्री १०.३० वाजता प्राप्त माहितीनुसार जायकवाडी प्रकल्पामधून ९४३२० क्यूसेक चे पाणी वितरित करण्यात येत आहे ह्या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या भागातील नदी पात्रात नागरीकांनी त्यांची चल, अचल मालमत्ता गोदापात्रातुन काढुन घ्यावी, कोणीही नदीपात्रात जाऊ नये, नदीकाठावरील गावांतील नागरीकांनी सतर्कता बाळगावी. जेणे करून कोणतीही जीवीत व वित्तहानी होणार नाही. असे कळविण्यात आले आहे. सर्वच २७ दरवाजे उघडले – जायकवाडी धरणामधून शुक्रवारी 18/09/2020 ठीक 3:30 ते 4:00 वा. दरम्यान गेट्स क्र 1,9,5,3,7,2,8,4,6 असे एकुण 9 गेट 1.5 फुट उंचीवरुन 2.0 उंचीवर करण्यात आले आहे व 4716 क्यूसेक विसर्ग गोदावरी नदी पात्रात वाढविण्यात आला आहे. 1) 4.0 फुटाने उघडण्यात आलेल्या गेटचे क्रमांक :- 10,27,18,19,16,21,14,23,12,25,11,26,13,24,15,22,17,20. 2) 2.0 फुटाने उघडण्यात आलेल्या गेटचा क्रमांक :- 1,9,5,3,7,2,8,4,6 (आपत्कालीन व्दार) असून सद्यस्थितीत सांडव्यातुन 89604+4716=94320 क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे. असल्याचे कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक